सध्या देशभरात ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. या प्रकरणावर सध्या सुनावणी सुरू आहे. दरम्यान, मंदिराच्या जागी मशीद उभारल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. आता पुण्यातही अशाच प्रकारे मंदिराच्या जागी मशीद उभी करण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागेवर मशिदी बांधल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. ज्ञानवारी मशिदीप्रमाणे पुण्यातील या मंदिराच्या जागी छोटा शेख, बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केला आहे. या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा उभारण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
(हेही वाचा – ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग पूजेला परवानगी द्या, महंतांची मागणी)
रविवारी पुण्यात मनसेची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना अजय शिंदे म्हणाले, पुण्येश्वरालाही मोठा इतिहास असून अल्लाउद्दीन खिल्जीचा बडा अरब हा सरदार पुण्यावर चाल करून आला, त्यावेळी त्याने भगवान शंकराचे मंदिर उध्वस्त केले. फक्त एकच नाही तर पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही दोन्ही मंदिरे उध्वस्त केली. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे तर दुसरे लालमहालाच्या थोडे पुढे आहे. आज तिथे छोटा शेख दर्गा आहे. सगळ्या मंदिरांच्या वर या मशिदी उभारण्यात आल्या आहेत. अजय शिंदेंच्या या वक्तव्यानंतर आता मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलेले आहे.
Join Our WhatsApp Community