Most Haunted Places In World : चला जाऊया जगातल्या सर्वांत भीतीदायक ठिकाणांवर – मोस्ट हॉन्टेड प्लेसेस इन वर्ल्ड

249
Most Haunted Places In World : चला जाऊया जगातल्या सर्वांत भीतीदायक ठिकाणांवर - मोस्ट हॉन्टेड प्लेसस इन वर्ल्ड
Most Haunted Places In World : चला जाऊया जगातल्या सर्वांत भीतीदायक ठिकाणांवर - मोस्ट हॉन्टेड प्लेसस इन वर्ल्ड

अनेकांना हॉरेर (हॉन्टेड) सिनेमे खूप आवडतात. (Most Haunted Places In World) त्यांना भीती वाटते, पण चादरीच्या आतमध्ये लपून ते सिमेने पाहतातच. वाचकांनो, सिनेमापर्यंत ठीक आहे. खरोखर एखाद्या हॉन्टेड ठिकाणी जाण्याची वेळ तुमच्यावर आली, तर काय कराल ? या जगात अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगात अनेक झपाटलेली (भितीदायक) ठिकाणे सुद्धा आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच ठिकाणांची माहिती सांगणार आहोत.

फ्रेन हिल हॉटेल, भारत

हे भूताचं हॉटेल मानलं जातं. मोस्ट हॉन्टेड प्लेसेस इन वर्ल्ड या श्रेणीतलं हे भयावह ठिकाण आहे. राझ या हॉरर थ्रिलर-चित्रपटाची शुटिंग सुरु होती. जेव्हा कोरिओग्राफर सरोज खान आणि त्यांचा क्रू हॉटेलमध्ये आराम करत होते, तेव्हा फर्स्ट फ्लोरवर काही आवाज ऐकू आले. त्यांनी रिसेप्शनवर फोन केला, पण टेलीफोन डेड होता. सकाळी रिसेप्शनिस्टने सांगितलं की, हॉटेलला फर्स्ट फ्लोअरच नाही. त्यानंतर सगळे लोक खूप घाबरले. ही घटना सर्वांना कळली. लोकांनी हॉटेलमध्ये जाणं बंद केलं. आता हे हॉटेल बंद झालं आहे. मात्र तिथे आजही विचित्र घटना घडतात अशा अफवा आहेत. (Most Haunted Places In World)

(हेही वाचा – My Lord in Supreme Court : जेव्हा न्यायमूर्ती वकिलांना स्वत:चा अर्धा पगार देऊ करतात…)

अराडले लुनाटिक एसाइलम, ऑस्ट्रेलिया

हे एक मानसिक रुग्णालय आहे. आज इथे जायला सगळे जण घाबरतात. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया शहरात स्थित अराडेल लुनाटिक एसायलम हे एक मानसिक रुग्णालय आहे. १८६७ मध्ये सुरु झालेलं रुग्णालय आज भूतांचं माहेरघर झालं आहे. या हॉस्पिटलमध्ये नर्स केरीचं भूत राहतं, अशा कथा सर्वदूर पसरल्या आहेत. त्यासंबंधित घटना देखील समोर आल्या आहेत. इथे ओल्ड मार्गारेट नावाचे भूतदेखील आहे. असं म्हणतात की, या मार्गारेटला अनेक रुग्णांनी आत्महत्या करण्यास मजबूर केले होते. ही गोष्ट १९९० मधली. मात्र आजही या ठिकाणी भूताचे अस्तित्व असल्याचे पुरावे सापडले आहेत.

बॅरी पोमेरॉयचा महाल, टॉटनेस

असे मानले जाते की, इथे निळ्या आणि सफेद महिलेचे भूत फिरत असते. सफेद महिलेचे नाव आहे मार्गेट पोमेरॉय. तिची बहीण तिचा द्वेष करायची. एक दिवस बहिणीने मार्गेटला कैद केले. उपासमारीने तिचा मृत्यू झाला. तिला पाणीसुद्धा देण्यात आले नव्हते. आज तिला पाणी नकोय, पण लोकांचे लाल लाल रक्त हवे आहे. निळी महिला कोण आहे, हे रहस्य मात्र अजूनही उलगडलेलं नाही. (Most Haunted Places In World)

लुलिया हसडेउ, रोमानिया

ही इमारत एक रहस्य आहे. लुलिया नावाची मुलगी मेली आणि तिच्या स्मरणार्थ तिच्या वडिलांनी ही इमारत बांधली. लोक असं सांगतात की, ते या इमारतीत आपल्या मेलेल्या मुलीसोबत बोलायचे. आज ते वडिलही राहिले नाहीत. मात्र इथून अजूनही आवज येत असतात. मेलेले वडील आणि लेक एकमेकांशी गप्पा मारत असावेत. मृत्यूनंतरही गप्पांचा हा सिलसिला सुरुच आहे. ह्या गप्पा आनंददायी नसून कर्कश आणि भीतीदायक आहेत. रोमानियामधील ही सर्वांत हॉन्टेट इमारत आहे.

स्क्रीमिंग टनेल, कॅनेडा

स्क्रीमिंग या नावातच या टनेलच्या विचित्रपणाचे वर्णन आहे. स्थानिक लोकांनी सांगितनुसार या टनेलमध्ये दोन मुलींना जिवंत जाळण्यात आले होते. आत या दोन्ही मुलींचा आत्मा इथे फिरत असतो, अशी माहिती मिळते. रोज रात्री एक मुलगी माचिस घेऊन स्वतःला इथे जाळून घेते आणि किंचाळते. हे असं रोज रात्र घडतं. म्हणूनच या बोगद्याला स्क्रीमिंग टनेल म्हणतात. कॅनेडात फिरायला गेलात, तर या ठिकाणी चुकूनही जाऊ नका. (Most Haunted Places In World)

हायगेट सेमेटरी, इंग्लंड

इंग्रजांनी अनेक वर्षे अनेक देशांवर राज्य केलं. पण इंग्लंडमध्ये असं एक ठिकाण आहे, जिथे भूतांचं राज्य आहे. १८३९ मध्ये नॉर्थ लंडनमध्ये निर्माण करण्यात आलेली हायगेट स्मशानभूमी ही जगातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. १,७०,००० पेक्षा जास्त लोकांना इथे दफन करण्यात आले आहे. इथे लाल डोळे आणि लांब काळा कोट घातलेला वॅम्पायर राहतो असं लोकांचं म्हणणं आहे. या स्मशानभूमीत एका महिलेचा जळालेला मृतदेह देखील सापडला होता. त्यामुळे लोक आणखीणच घाबरले आहेत. आता हे ठिकाण जगातील मोस्ट हॉन्टेड ठिकाणांपैकी एक आहे. (Most Haunted Places In World)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.