शस्त्रक्रियेचा खर्च नको म्हणून तिने सासूला केले ठार!

148

उपचारासाठी मुंबईत आणलेल्या सासूच्या शस्त्रक्रियेचा खर्च वाचवण्यासाठी सूनेने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील धारावी येथे घडली. याप्रकरणी धारावी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सूनेला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पतीने फोन केल्यावर पत्नी म्हणाली…

अँथोनी मुतुस्वामी (६१) असे हत्या करण्यात आलेल्या सासूचे नाव आहे. अँथोनी मुतुस्वामी ही गावी राहत होती व मुलगा आपल्या कुटुंबियांसह धारावी परिरसरात राहत होती. गेल्या आठवड्यात अँथोनीचा मुलगा मुरुगन याने आईची खुशाली विचारण्यासाठी फोन केला असता आईने त्याला बोलताना दम लागतो, अशी तक्रार मुलाकडे केली होती. मुलाने मी गावी येतो आणि तिकडे डॉक्टरला दाखवतो, असे त्याने आईला सांगितले होते. मात्र पत्नीने मुरूगनला गावी जाण्यास मनाई केल्यामुळे मुरुगन याने गावाहून मुंबईला येणाऱ्या एका नातेवाईकाच्या मदतीने आईला मुंबईला बोलावून घेतले होते.

हेही वाचा : गुलाबाराव पाटलांच्या वक्तव्यावर हेमा मालिनी काय म्हणाल्या? वाचा… )

सून शांती मुतुस्वामी हिला अटक

आई धारावी येथे आल्यानंतर मुरूगनने स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी आणले होते, मात्र डॉक्टरांनी आईला सायन, गांधी मार्केट येथील एका रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मुरूगनने आईवर उपचार सुरु केले असता डॉक्टरांनी आईला वाँल्वचा त्रास आहे, वाँल्वची शस्त्रक्रिया करावी लागेल त्यासाठी अंदाजे ३ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. आईची शस्त्रक्रिया करायची असल्याचे सांगून डॉक्टरांनी ३ लाख रुपये खर्च सांगितला, असे मुरूगनने पत्नी शांती (३७) हिला सांगितल्यामुळे ती नाराज झाली होती. गुरुवारी मुरुगन हा कामावर गेला होता, तेव्हा मुलीने फोन करून आजी चक्कर येऊन बाथरुममध्ये पडली, असे सांगितले असता मुरुगन घरी आला व त्याने आईचा उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती निपचित पडली होती, तिच्या हातावर ओरखडे होते. मुरूगनने आईला सायनच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी मुरुगन याने धारावी पोलिस ठाण्यात पत्नी शांती हिच्याविरुद्ध तक्रार दाखल करून आईच्या शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चातून पत्नीने आईची हत्या केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सून शांती मुतुस्वामी हिला अटक केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.