…म्हणून त्याला लागला मोटारसायकल चोरीचा नाद!

94

दोन वर्षांपूर्वी त्याची मोटारसायकल कोणीतरी चोरली होती, त्याचा सूड घेण्यासाठी तो दुसऱ्याची मोटारसायकल चोरी करून वापरत होता. तर दुसरा बहिणीची हौस पूर्ण करण्यासाठी मोटरसायकल चोरी करून बहिणीला फिरवायचा अशी माहिती आरे पोलिसांनी अटक केलेल्या मोटारसायकल चोराच्या चौकशीत समोर आली आहे. आरे कॉलनी येथील बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या त्रिकूटाना तिघांना दरोड्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली होती, या तिघांच्या चौकशीत मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून आरे पोलिसांनी १२ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

कोण आहे हे चोरी करणारं त्रिकुट

अलंकार गुडेकर (२१), कृष्णा शुक्ला उर्फ किसन (२२) आणि सिबु कमल आदक उर्फ आकाश बंगाली (१९) असे अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाची नावे आहेत. अंधेरी पूर्व पंप हाऊस या ठिकाणी राहणारे तिघे मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तिघांचे शिक्षण बारावी पर्यत झालेले आहेत. आरे कॉलनी या ठिकाणी मयूर मार्केट या ठिकाणी काही इसम बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती आरे सब पोलीस ठाण्यातील गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सपोनि. उल्हास खोल्लम यांना मिळाली होती.

(हेही वाचा – अँटिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणात लवकरच होणार गौप्यस्फोट! )

त्रिकुटाच्या संशयावरून पोलिसांनी घेतलं ताब्यात

या माहितीच्या आधारे प्रभारी वपोनि. वाल्मिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. खोल्लम, पोऊनी सावंत, अंमलदार बडे, भाबड , ढोक, शिंगाणे, थोरात, जानराव, काटे, गोडसे आणि चव्हाण या पथकाने सापळा रचून या तिघांना संशयावरून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यानी बाईक्स चोरीची कबुली दिली. पोलीस पथकाने या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून कसून चौकशी असता या तिघांनी पश्चिम उपनगरात सुमारे डझनभर बाईक्स चोरल्याची कबुली पोलिसांनी या तिघीजवळून १२ बाईक्स जप्त करण्यात आलेल्या आहेत.

दुसऱ्याच्या बाईक चोरी करण्याचा लावला सपाटा

कृष्णा शुक्ला याची स्वतःची बाईक दोन वर्षांपूर्वी चोरीला गेली होती. त्याची बाईक मिळत नाही म्हणून त्याने दुसऱ्याच्या बाईक चोरी करण्याचा सपाटा लावला होता. अलंकार गुडेकर याचे आपल्या लहान बहिणीवर खूप प्रेम आहे, बहिनीचे सर्व लाड अलंकार पुरवतो. बहिणीला पल्सर बाईक खूप आवडते म्हणून त्याने पहिल्यांदा पल्सर बाईक चोरली व बहिणीला दाखवली. मित्राची बाईक असल्याचे सांगून तो बहिनीला बाईक वर फिरवायाला घेऊन जायचा. हळूहळू त्याने पल्सर मोटारसायकल चोरी करू लागला होता. हे तिघे बाईक्स चोरी करून त्याची विक्री न करता स्वतः त्या वापरत होते, बाईकचे पेट्रोल संपले की बाईक एका ठिकाणी उभी करून दुसरी बाईक चोरी करायचे अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.