Motorola Smartphone : मोटोरोलाचा असा फोन जो मनगटाभोवती गुंडाळता येतो 

मोटोरोला कंपनीने अलीकडे एका कार्यक्रमात आपला हाताभोवती गुंडाळता येणारा फोन सादर केला आहे. हा फोन दिसतो कसा? तो वापरायचा कसा?

174
Motorola Smartphone : मोटोरोलाचा असा फोन जो मनगटाभोवती गुंडाळता येतो 
Motorola Smartphone : मोटोरोलाचा असा फोन जो मनगटाभोवती गुंडाळता येतो 

ऋजुता लुकतुके

मोटोरोला या स्मार्टफोन (Motorola Smartphone) कंपनीने अलीकडेच लिनोवो टेकफेस्टमध्ये आपला अत्याधुनिक हाताभोवती गुंडाळता येणारा फोन सादर केला आहे. त्यामुळे सॅमसंग आणि ओपोच्या फोल्डेबल फोनबरोबरच आता मोटोरोलाचा बेंडेबल फोनही ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. अर्थात, फोनचं नियमित उत्पादन कधी सुरू होईल हे कंपनीने स्पष्ट केलेलं नाही.

अर्थातच या फोनचा डिस्प्ले वेगळा आहे. आणि फोल्डेबल फोन प्रमाणेच इथंही फोनची ॲप स्वतंत्रपणे बनवावी लागतात. इतर फोनमधील ॲप इथं चालत नाहीत. मोटोरोला कंपनीने या फोनला मनगटी फोन असंही नाव दिलं आहे. २०१६ मध्ये या फोनची संकल्पना सगळ्यात आधी मांडण्यात आली होती. पण, त्यानंतर कुठल्याही कंपनीने तो तयार करण्याकडे लक्ष दिलं नाही.

(हेही वाचा-Lalit Patil Drug Case : नाशिकच्या सराफ व्यावसायिकाला पुणे पोलिसांकडून अटक)

पण, आता मोटोरोला कंपनीने यात पुढाकार घेतला आहे. फोन गुंडाळलेला नसताना त्याची स्क्रीन ६.९ इंच इतकी आहे. तर सेल्फ स्टँडिंग मोडमध्ये ती ४.६ इंच इतकी कमीही होते. मोटोरोला ही लिनोवो या प्रामुख्याने लॅपटॉप आणि टॅब बनवणाऱ्या कंपनीची उपकंपनी आहे. त्यामुळे कंपनीकडे फोल्डेबल लॅपटॉप आणि टॅब बनवण्याचा अनुभव आहे. तेच तंत्रज्जान बेन्डेबल मोबाईलमध्ये वापरण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

कंपनीने या फोनचं नियमित उत्पादन कधी सुरू करणार आणि फोनची किंमत तसंच इतर माहिती अजिबात उघड केलेली नाही. फोल्डेबल मोबाईल फोन ही संकल्पनाही पूर्वीपासून अस्तित्वात होती. पण, अगदी अलीकडे त्यांची लोकप्रियता वाढली. हे पाहता, बेन्डी मोबाईल बद्दल लोकांमध्ये इतक्यात कुतुहल निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे मोटोरोला कंपनीही या प्रकल्पावर सावधपणे काम करताना दिसतेय.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.