शिखर एल्ब्रुसवरून गिर्यारोहक प्रणित शेळके यांनी दिल्या स्वातंत्र्याच्या शुभेच्छा

80

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे गिर्यारोहक प्रणित शेळके यांनी एल्ब्रुस शिखर सर केले आणि त्या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकावून देशवासियांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या.

एल्ब्रुस शिखरावर राष्ट्रगीत गायले

रशियातील एल्ब्रुस या ५ हजार ७४२ मीटर उंच शिखरावर चढाई करून १५ ऑगस्ट रोजी शिखराची उंची गाठून तेथूनच भारतीयांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देण्याचा मानस प्रणित शेळके यांनी केला होता. एल्ब्रुस हे रशियातील सर्वात उंच शिखर आहे. शेळके हे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत भारतीय चमूमध्ये एकूण चारजण आहेत. या मोहिमेवर जाण्याआधी शेळके यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांची भेट घेतली होती. यावेळी वीर सावरकर स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर हे सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी शेळके यांना स्मारकाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. त्यावेळी शेळके यांनी शिखरावर पोहचल्यावर तिरंगा फडकावत, राष्ट्रगीत गायले, त्यानंतर भारतीयांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या.

(हेही वाचा आम्ही फक्त अल्लाची पूजा करतो, म्हणून वंदे मातरम म्हणणार नाही! रझा अकादमीचा विरोध)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.