MPSC चे विद्यार्थी लेखी आदेश निघेपर्यंत आंदोलनावर ठाम! शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्र्याची भेट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचे बालगंधर्व चौकात आंदोलन सुरू आहे. यावेळी मंगळवारी रात्री शरद पवारांनी विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. जोवर लिखित आदेश किंवा MPSC मार्फत अधिकृत सूचना जाहीर करण्यात येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा अवलंबला आहे.

( हेही वाचा : संजय राऊतांच्या आरोपानंतर ठाणे पोलीस पोहोचले नाशिकला! जबाब नोंदवण्यास सुरूवात, सुरक्षेत वाढ)

आंदोलन मागे घेणार नाही…

आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आमच्या मागणीची अधिकृत नोटीस काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी यावेळी मांडली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन केले तेव्हा आम्हाला फक्त आश्वासन दिले गेले. असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. यावर विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात हे आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा आता तिसरा दिवस आहे. ५ विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहे. या बैठकीला एमपीएससीचे अध्यक्ष आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित असणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here