अभिनेता साहिल खान याच्या त्रासाला कंटाळून मिस्टर इंडिया मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याने विषारी गोळ्या खाल्ल्या आहेत. त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे.
साहिल खान विरोधात केलेली पोलिस तक्रार!
साहिल खानविरोधात याआधीही मनोजने पोलिसात तक्रार केल्याचे समोर आले. अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, साहिल माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अपप्रचार करतो, तसेच माझे करिअर संपवण्याची धमकी देतो, असा आरोप मनोजने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आहे. मनोज पाटीलने २०१६ मध्ये ‘मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ हा गौरव प्राप्त केला होता. तो एक सुप्रसिद्ध मॉडेल, अॅथलीट आणि ट्रेनरही आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या स्वप्नांचा मागोवा घेत तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
(हेही वाचा : ओबीसी आरक्षणाचा आध्यादेशही अडचणीत! कारण काय?)
वर्तमानपत्र विकण्यापासून सुरुवात
वयाच्या १६ व्या वर्षी मनोजने जवळच्या जिममध्ये व्यायामाला सुरुवात केली. वयाच्या १८व्या वर्षी त्याला शरीरसौष्ठव स्पर्धांबद्दल माहिती मिळाली आणि काही स्पर्धांमध्ये त्याने भाग घेण्यास सुरुवात केली. पण पदरी आलेल्या अपयशाने तो खचून गेला नाही, तर त्याने येत्या काही वर्षांत अधिक मेहनत घेण्यास सुरुवात केली.
Join Our WhatsApp Community