वीज बिल वसुलीवरून महावितरण कर्मचारी, ग्राहकांमध्ये जुंपली! 

सचिन शिंदे या वीज ग्राहकाची 1 मार्च 2020 पासून 19 हजार रुपये वीज बिलाची थकबाकी आहे. त्यांना थकीत बिल भरण्याबाबत वारंवार सूचना केली, तरीही त्यांनी वीज बिल भरले नाही.    

महावितरण कंपनीच्या गंगा व्हिलेज कार्यालयातून कर्मचारी अविनाश भोसले हे जेव्हा महंमदवाडीमध्ये (स.नं.59, तरवडेवस्ती) थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी गेले असता त्यांना सचिन शिंदे यांनी मारहाण केली. दमदाटी, शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी भोसले यांनी महंमदवाडी पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

सचिन शिंदे या वीज ग्राहकाची 1 मार्च 2020 पासून 19 हजार रुपये वीज बिलाची थकबाकी आहे. त्यांना थकीत बिल भरण्याबाबत वारंवार सूचना केली, तरीही त्यांनी वीज बिल भरले नाही. म्हणून कर्मचारी अविनाश भोसले हे त्यांच्याकडे वीज बिल वसुलीसाठी गेले. त्यावेळी तेथे त्यांचा मुलगा सचिन शिंदे आला, त्याने आरडाओरड करीत दमदाटी करत,  घराच्या प्रवेशद्वारापासून शिवीगाळ करीत, हातात बांबू घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून आला.

(हेही वाचा : मुंबई पोलिस आयुक्त बदलण्यावरुन ठाकरे सरकारमध्ये दोन गट?)

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल! 

दरम्यान, महावितरणचे कार्यकारी अभियंता सतीश राजदीप म्हणाले की, वीज वितरण यंत्रणा सुरळीत ठेवायची असेल, तर प्रत्येक नागरिकाने वापरलेल्या विजेचे बिल भरणे आवश्यक आहे. मागील वर्षभरापासून अनेकांकडे विजेची थकित बिले आहेत, विजेचे बिल वेळेत भरा, मनस्ताप टाळा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी काही ठिकाणी मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वीज बिल वसूल करण्यात अडथळे येत असल्याने यापुढे जर ग्राहकांकडून वीज कनेक्शन कापण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर जर मारहाण होत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही, असे मत व्यक्त केले. वीज बिल वसुलीसाठी सहकार्य करणे महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here