‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ व ‘गांव तिथे एसटी’ अशी संकल्पना राबवून ST महामंडळ प्रवाशांच्या सेवेला व सुविधेला प्राधान्य देत आले आहे. मात्र काही चालक गावातील लहान थांब्यांवर बस न थांबिवता थेट पुढे निघून जातात. अशा कित्येक तक्रारी महामंडळाकडे आल्या आहेत. त्यामुळे थांब्यावर बस न थांबविल्यास चालकाला दोषी धरण्यात येणार आहे. दरम्यान, काही कर्मचाऱ्यांकडून प्रवासी हित जोपासत नसल्याचे आढळून आल्यास महामंडळाने आता कठोर पवित्रा घेतल्याचे समोर आले आहे.
प्रवाशांच्या सोईसाठी थांबे निश्चित करण्यात आले असल्याने अशा ठिकाणी बस थांबविणे चालकाचे प्रथम कर्तव्य आहे. प्रवासी थांब्यावर बसेस न थांबविल्यास चालकावर कारवाई करण्यात येणार आहे. नागपूर उड्डाणपुलाखाली असलेल्या थांब्यावर बस थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. बसची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. गावातील आतमधल्या रस्त्यावर लहान थांबे आहेत. प्रवासी न पाहताच चालक गाडी सुसाट नेतात, त्यामुळे एसटीची वाट पाहणाऱ्या खेड्यापाड्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशा गावांमध्ये एसटी शिवाय वाहतुकीचा दुसरा पर्याय राहत नाही. याबाबत बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्याने महामंडळाने नियोजित थांब्यावर बस न थांबविल्यास चालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
(हेही वाचा – मोदींची मोठी घोषणा! PM SHRI School योजनेंतर्गत शाळा होणार अपग्रेड, जाणून घ्या वैशिष्ट्ये)
मार्ग तपासणीत किंवा तक्रारीत चालक दोषी आढळल्यास चालकावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर वाहकाला सुद्धा दोषी ठरविण्यात येईल, असेही महामंडळाकडून सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community