पुण्यात एसटीचा ब्रेक फेल, बसची अनेक वाहनांना धडक

पुण्यातील सातारा रस्त्यावर एसटीचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात घडला असल्याची माहिती मिळतेय. ही घटना गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. एसटी बसचा ब्रेक फेल झालेल्या एसटी बसने अनेक वाहनांना मागून धडक दिली असून या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी तर चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले आहेत.

(हेही वाचा – INS Vikrant प्रकरण: सोमय्या आणि मुलाला उच्च न्यायालयाचा दिलासा)

अशी घडली घटना

पुण्यातील शंकर महाराज उड्डाणपुलावर गुरूवारी एसटीचा भीषण अपघात झाला. एसटीचा ब्रेक फेल झाल्‍याने तीन ते चार दुचाकीस्‍वारांना एसटीने उडवल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. तसेच एका कारलाही धडक दिली. दुसऱ्या वाहनांशी अपघात टाळण्यासाठी दोन ते तीन ठिकाणी चालकाने गाडी धडकवल्‍याचे सांगितले जात आहे.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र तीन जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या जखमींना उपचारांसाठी तात्‍काळ ससून रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली असून पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here