चिठ्ठी लिहून एसटी कर्मचाऱ्याची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या!

110

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. हा संप अद्याप मिटत नसून या संपादरम्यान अनेकांचे जीव गेले. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावात हा प्रकार झाला असून चालकाने रेल्वेखाली स्‍वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

(हेही वाचा – आम्ही हे खपवून घेणार नाही, आदेशाची वाट पाहतोय! शिवसेनेचा नेता कोणावर आहे नाराज? )

मिळालेल्या माहितीनुसार, राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या जळगाव विभागातील यावल आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्‍या शिवाजी पंडित पाटील (वय ४५) यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. परिवहन महामंडळातील कर्मचारींच्‍या संपादरम्‍यान आजची आत्‍महत्‍या ही राज्यातील ११४ वी तर जळगाव जिल्ह्यातील तिसरा बळी गेला आहे. शिवाजी पंडीत पाटील वय ४५ रा. बारीपाडा, यावल असे मयत एस.टी कर्मचार्‍याचे नाव आहे. त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे. मनस्थिती खराब झाल्याने आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद केलेले आहे.

असे लिहीले होते चिठ्ठीत

आत्महत्येपूर्वी लिहीली सुसाईट नोट सुसाईड नोट मध्ये, “माझी मनस्थिती खराब असल्याने मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे, माझ्या आत्महत्येचा माझ्या परिवाराशी काहीही संबंध नाही, धन्यवाद” असे म्हटले आहे. मयत शिवाजी पाटील यांच्या पश्चात पत्नी हिरकणीबाई , मुलगा हेमंत व मुलगी उत्तेषा व आई, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, मृतदेहाचे खिसे तपासले असता खिशात एक डायरी मिळून आली. डायरीत असलेले ओळखपत्र आणि सुसाईड नोट वरून मृताची ओळख पटली.

त्यामुळे संपाचा तिढा कायम

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, अशी संपकरी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाने नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल आला आहे. विलिनीकरणाची मागणी व्यवहार्य नसल्याचे सांगत समितीने ही मागणी अहवालातून फेटाळून लावली आहे. राज्य सरकारनेही विलिनीकरण शक्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे संपाचा तिढा कायम आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.