परभणीत एसटी उलटली; १२ प्रवासी जखमी

एसटी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी झाल्याची थरारक घटना परभणीत घडली आहे. यावेळी या बसमधून ४० जण प्रवास करत होते. या अपघातामध्ये बसमधील १२ प्रवासी जखमी झाले, त्यांच्यावर जिंतूर येथील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. यापैकी एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे.

ही घटना परभणीच्या जिंतूर शहरापासून पासून २० किमी अंतरावर बामणी फाट्याजवळ घडली आहे. अपघातामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीतून प्रवास करणे खरेच सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परभणीच्या जिंतूर सायखेडा आगाराची बस क्र. MH 20 BL 0161 ही बस जिंतूर तालुक्यातील सायखेडा येथील ४० प्रवासी घेऊन जिंतूर शहराकडे येत होती. याच मार्गावरील बामणी फाट्याजवळ ही बस आली असता चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे ही बस रस्त्याच्या कडेला जाऊन लिंबाच्या झाडाला आदळून पलटी झाली. यावेळी बसमध्ये चालक आणि वाहकासह ४० प्रवासी होते. अपघातामध्ये बसमधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, बस चालक बाळराज राजाराम शेळके हे किरकोळ जखमी झाले आहेत, तर वाहक दत्तात्रेय रंगनाथ कापुरे यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. अपघाताची माहिती समजतात नागरिकांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. अपघातामध्ये जखमी झालेल्या १२ जणांना उपचारासाठी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे.

(हेही वाचा पाठ्यपुस्तकांच्या बदलाच्या निर्णयात ‘बदल’; पुढच्या वर्षी कशी असणार पुस्तके?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here