एसटी महामंडळाने अलिकडे पाच हजार कंत्राटी चालक भरती करण्याचा निर्णय घेतला होता परंतु आता महामंडळाने भरती करण्याची योजना रद्द केली आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कायमस्वरूपी चालकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. यावेळी प्रवाशांची गैरसोय होत असल्याने कंत्राटी चालकांची भरती करून एसटी सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न महामंडळाने केला. यानंतर कंत्राची चालकांची संख्या कमी करण्यात आली.
( हेही वाचा : तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट तुमच्याशिवाय कोण वापरतंय? या प्रक्रियेद्वारे मिळेल संपूर्ण माहिती )
संपादरम्यान चालकांअभावी एसटी गाड्याही आगारात उभ्या होत्या प्रवाशांची गैरसोय आणि एसटी महामंडळाला होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी कोकण, पुणे, नाशिकसह अन्य काही विभागांमध्ये या समस्येतून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर पाच हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यासाठी जून २०२२ पासून निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरू केली होती.
पाच हजार कंत्राटी चालकांची भरती रद्द करण्याचे कारण काय?
२०१६-१७ आणि २०१९ मध्ये एसटी महामंडळाने भरती प्रक्रिया राबवली होती यावेळी अंतिम निवड प्रक्रियेला कोरोना काळात तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. संप काळात हे काम थांबले. स्थगिती उठवल्यानंतर बहुतांश चालकांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले. या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. अखेर या चालक कम वाहकांची नियुक्ती करण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला असून यामुळेच ५ हजार कंत्राटी चालकांची भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community