MSRTC : एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

98

एसटी महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार यांच्यासह २९ समाज घटकांना प्रवासी भाड्यात ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. ही सवलत मिळवण्यासाठी पात्र लाभार्थींकडे एसटीचे स्मार्ट कार्ड असणे आवश्यक आहे. ३० जूनपर्यंत हे कार्ड काढण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर स्मार्टकार्ड काढण्यासाठी आता एसटी महामंडळाने ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुदतवाढ

आषाढी पंढरपुर यात्रा असल्याने सदर यात्रेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून व ज्येष्ठ नागरिकांच्या येत असलेल्या मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्टकार्ड नोंदणीकरण व वितरण (Issuance) करण्यासाठी दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे असे एसटी महामंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

१ सप्टेंबर २०२२ स्मार्टकार्ड आवश्यक

सध्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रचलित ओळखपत्रांच्या आधारे एसटीत प्रवासाच्या सवलतीचा लाभ दिला आहे. ही प्रचलित ओळखपत्र नव्या नियमांनुसार ३१ ऑगस्टपर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. दिनांक १ सप्टेंबर २०२२ पासून ही ओळखपत्र ग्राह्य धरली जाणार नाहीत. १ सप्टेंबरपासून स्मार्ट कार्ड असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच सवलतीचा लाभ मिळणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.