राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी एसटी महामंडळाकडून तब्बल ११८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ कऱण्यात आले होते. या बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. यानंतर या कर्मचाऱ्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला तर गुणरत्न सदावर्तेंनी राज्य सरकारचे आभार मानले होत.
(हेही वाचा – MSRTC: पुण्यातील शिवाजीनगर एसटी बस स्टँडचे होणार स्थलांतर?)
एसटी महामंडळाकडून बडतर्फ करण्यात आलेल्या या सर्व कर्मचाऱ्यांना ८ महिन्यांनंतर पुन्हा सेवेत घेतले जाणार असून पूर्वीच्याच जागी आणि कामावर ते आजपासून रूजू होणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच राज्य सरकारकडून मोठी भेट मिळाल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन खूपच गाजले होते. यावेळी पवारांच्या घरावर एसटी आंदोलकांनी हल्ला केला होता. त्यानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसह वकील सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांनतर तब्बल ११८ कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले होते.
गेल्या आठवड्यात एसटी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यावेळी एसटी महामंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले होते. संप काळात जवळपास ११८ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले. त्याच कर्मचाऱ्यांना आता मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर पुन्हा सेवेत घेण्यात आले असून ते आजपासून सेवेत रूजू झाले आहेत.
Join Our WhatsApp Community