बुलढाण्यातील MSRTC बस पत्रा अपघात प्रकरणी चालक-वाहक निलंबित

130

धावत्या एसटी बसच्या तुटलेल्या पत्र्यामुळे रस्त्याच्या कडेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरूणांचे हात कापल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणात आता एसटी महामंडळातर्फे नागपूर नियंत्रण समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत असून या प्रकरणात संबंधित बस चालक आणि वाहकास त्वरीत तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. प्रादेशिक व्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून ही चौकशी होत आहे. सविस्तर अहवाल मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.

काय होते प्रकरण

मलकापूर- पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही घटना घडली. यावेळी काही तरूण रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत आहे. यावेळी याच मार्गावरून मलाकापूर आगाराची बस जात असताना चालकाच्या केबीनच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आलेला होता. त्यामुळे या व्यायाम करणाऱ्या तरूणांना या पत्र्याचा धक्का लागून दोन तरूणांचे हात कापले गेले. या घटनेत गणेश शंकर पवार याच्या हाताला जबर मार लागला. सोबतच विकास गजानन पांडे व परमेश्वर आनंदा सुरडकर या दोघांचे हात अक्षरशः तुटून पडले.

(हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी मोठा निर्णय! सचिवांना दिलेले अधिकार पुन्हा मंत्र्यांकडे)

यातील एकाची प्रकृती नाजूक आहे. घटनास्थळी समिती सदस्यांसह जळगाव खान्देशचे विभाग नियंत्रण, बुलढाण्याचे डीटीओ, यंत्र अभियंता, डेप्युटी मॅकेनिकल इंजिनियरसह काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. अपघातग्रस्त बसचे गेल्या १५ दिवसांचे सीसीटिव्ही फुटेज चौकशी समितीने तपासले आहे. सोबतच घटनेच्या आदल्या दिवशी ही बस आगारात आल्यानंतरच्या फुटेजचीही तपासणी करण्यात आली. मात्र दुर्घटनेचे काही फुटेज मिळते का याचीही तपासणी समितीकडून केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.