एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. एसटी कर्मचारी संघटनांनी या मागण्या मान्य न झाल्यास हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलनाचा इशारा दिला आहे.
८८ हजार कर्मचाऱ्यांना फटका
दरम्यान राज्य सरकारकडून आवश्यक निधी न मिळाल्यामुळे भविष्य निर्वाह निधी (पीएफ), ग्रॅच्युइटीची रक्कम गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून एसटी ट्रस्टकडे जमा झालेली नाही. ही रक्कम सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंत असून यामुळे ८८ हजार कर्मचाऱ्यांना फटका बसला आहे.
( हेही वाचा : ट्रेनमधून रात्री प्रवास करताना करू नका ‘या’ चुका! अन्यथा होणार कारवाई; रात्रीचे दिवे लावण्यासंदर्भातही विशेष नियम… )
कर्मचाऱ्यांचे पगार आणि अन्य देणी देण्यासाठी महामंडळाकडे पुरेसा निधी नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी प्रवासी उत्पन्नातून समायोजन करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फटका पीएफ आणि ग्रॅच्युइटीच्या रक्कमेवर झाला आहे. सरकारकडून अपेक्षित निधी न मिळाल्यामुळे ही रक्कम एसटीच्या स्वतंत्र ट्रस्टकडे भरली गेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही रक्कम जवळपास ५०० कोटींपर्यंत आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून राज्य शासनाकडून अपेक्षित निधी न मिळाल्याने यावेळी ७९० कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती परंतु शासनाने केवळ २०० कोटी रुपये दिले. अशा अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Join Our WhatsApp Community