एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा तिढा सुटणार, सवलत मूल्यासह दरमहा मिळणार ३२० कोटी

एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाचा मार्ग आता मोकळा होणार आहे. राज्य सरकार सवलत मूल्याचे २२० कोटी यासोबतच अतिरिक्त १०० कोटी रुपये दरमहा एसटी महामंडळाच्या खात्यात जमा करणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. पगाराची तारीख उलटून गेल्यानंतरही कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने संतापाचे वातावरण होते. एसटी महामंडळाकडून अर्थ विभागाला या संदर्भात पत्र लिहिण्यात आले होते. यानंतर अर्थ, परिवहन आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

( हेही वाचा : फक्त ६ हजारात उदयपूर फिरण्याची संधी! IRCTC चे स्वस्त मस्त टूर पॅकेज)

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना दर महिन्याला ७ ते १० तारखेमध्ये पगार करण्याचे आश्वासन सरकारने कोर्टामध्ये दिले होते. परंतु दर महिन्याला पगाराला उशीर होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. महामंडळावर काही संघटनांच्यावतीने याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. दरम्यान कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन व्हावे यासाठी सरकारने घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे. महामंडळ अधिक सक्षम व्हावे याकरता नवीन बसेसच्या दृष्टीने निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे श्रीरंग बरगे यांनी सांगितले आहे.

एक प्रतिक्रिया

  1. कोर्टात ७/१० ता. लीहून दिली असता , उशीरा पगाराचे नाटकं का ? इतर ठीकाणी वारेमाप देणग्या / मदत का करता ? तो पैसा कामगारांच्या पगाराला वापरा , मगच इतर विचार करा 🤔

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here