कुणाला पगार, कुणाला ‘मेस्मा’? एसटी कर्मचाऱ्यांचा आज होणार निर्णय

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटण्याचे काही संकेत दिसत नाही. त्यामुळे या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. आता कर्मचारी कामावर लवकरात लवकर रुजू न झाल्यास कर्मचाऱ्यांचे पगार रोखणार असल्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. इतकेच नाही तर जो संपकरी कर्मचारी अद्याप संपावर ठाम आहे, अशा कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याबाबचा निर्णय आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कुणाला पगार, कुणाला ‘मेस्मा’ याचा फैसला आजच्या बैठकीत होणार असल्याचे म्हटले जात आहे.

(हेही वाचा – ‘प्रेसिडंट स्टँडर्ड’ पुरस्काराने सन्मानित होणार मुंबईतील ‘युद्ध नौका’!)

दरम्यान, संपातून माघार घेऊन एसटीच्या सेवेत हजर झालेल्या 19 हजार कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतनवाढीनुसार, पगार होणार आहेत. मात्र संपकरी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवले जाण्याची दाट शक्यता आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार पगार

एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे म्हणून संप केला आहे. या संपकाळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी समस्त कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते, मात्र कर्मचाऱ्यांनी संप करण्याचे कायम ठेवले. अशा परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेत कामावर रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आज सुधारित वेतनवाढीनुसार पगार मिळणार आहे.

कॅबिनेट बैठकीत होणार निर्णय

राज्यातील जवळपास 19 हजार एसटी कर्मचाऱ्यांचा सुधारित वेतनवाढीनुसार आज पगार होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर संपकरी कर्मचाऱ्यांना मात्र पगाराला मुकावं लागणार आहे. संपकऱ्यांवर मेस्मा कारवाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मेस्माची बैठक होणार असून या बैठकीकडे कर्मचाऱ्यांसह साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here