एसटीच्या संपाबाबतची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात होती, मात्र आजही त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याने ही सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी ५ जानेवारीला होणार आहे. या प्रकरणात त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल सादर केल्याची माहितीही समोर आली आहे. या संदर्भात माहिती देताना एसटी कर्मचाऱ्यांकडून लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, आजपर्यंत ५७ एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला तब्बल ५० दिवस उलटून गेले तरीही अद्याप हा वाद संपलेला नाही. अनेक बैठका झाल्या, सरकारने ऐतिहासिक ४१ टक्के पगारवाढ केली, मात्र तरीही अनेक कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जानेवारीला
या सुनावणी दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू ऱोखठोकपणे मांडली. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती प्रसन्न वराडे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी झालेल्या युक्तीवादात महामंळाच्या वकिलांनी देखील भूमिका मांडली. या सुनावणीवेळी न्यायालयात राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. यावेळी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ५ जानेवारीला होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
(हेही वाचा – सिग्नल काउंटडाऊनमुळे नवी मुंबईत झाला गोंधळ! वाचा)
न्यायालयाने काय म्हटले…
यावेळी न्यायालयाने असे म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई सुरु करण्यापूर्वी त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी. एसटी कर्मचाऱ्यांची बाजू माडतांना सदावर्ते म्हणाले, सध्या विद्यार्थांचे कोणतेही नुकसान होत नाही. कारण सध्या शाळा नाताळच्या सुट्टीसाठी बंद आहेत. त्यामुळे कुठल्याही, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान नाही होत आहे. कुणाचेही नुकसान न व्हावे ही कर्मचाऱ्यांची इच्छा आहे.