दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परिवहन महामंडळाने (एसटी) १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दैनंदिन प्रवाशांवरील ताण लक्षात घेता शिवनेरी आणि अश्वमेध सेवेला या भाडेवाढीतून वगळण्यात आले आहे.
(हेही वाचा – MSRTC: पुणेकरांना एसटी महामंडळाकडून दिवाळी भेट, काय आहे घोषणा…)
एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यांपर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही दि. २० आणि २१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ नंतर प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना सुधारित १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. ही भाडेवाड ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत कायम राहील. साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी गाड्यांना ही भाडेवाढ लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध बस सेवेला यातून वगळण्यात आले आहे.
आगाऊ आरक्षण केलेल्यांकडून पैसे घेणार
ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे, त्यांच्याकडून वाहकाव्दारे (कंडक्टर) आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. तथापी, ही भाडेवाढ एस.टी. च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक व विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेंबर पासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमी प्रमाणे तिकीट दर आकारले जातील, असे एसटी महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community