पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले, प्रवाशांना सोयीचे ठरणारे शिवाजीनगर एसटी स्थानक कायमस्वरूपी वाकडेवाडीला ठेवण्यास पुणेकरांचा तीव्र विरोध आहे. महामेट्रोच्या या जागेवरचे भुयारी स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर वरील जागेवर पूर्वीप्रमाणेच एसटी स्थानक बांधण्यास महामंडळाकडून विलंब होत असल्याने हे जुने स्थानक इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.
(हेही वाचा – MSRTC: पुणेकरांना एसटी महामंडळाकडून दिवाळी भेट, काय आहे घोषणा…)
दरम्यान, आता तर वाकडेवाडी स्थानकाच्या जागेसंदर्भातही या जागेचा करार संपल्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महामंडळ वापरत असलेल्या या जागेचे भाडे महामेट्रो जमा करत आहे. करारात तसेच नमूद करण्यात आले होते. महामंडळ व महामेट्रो यांच्यातील हा सामंजस्य करार १० सप्टेंबरला संपला. तत्पूर्वीच महामेट्रोने वाकडेवाडीच्या जागेचा करार संपल्याचे पत्र महामंडळाला दिले. ही जागा सरकारच्याच एका विभागाची आहे, मात्र तरीही या जागेचे भाडे महामेट्रोला द्यावे लागत आहे. आता करार संपल्यावर भाडे कोणी जमा करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईहून कोणी वाकडेवाडीला आले व त्यांना तिथे उतरून कोथरुडला जायचे असेल तर या दोन्ही प्रवास तिकीट भाडे सारखेच असून पुण्यातील रिक्षा महाग आहे. स्थानक आहे तिथेच ठेवावे. वाकडेवाडीला हवे तर दुसरे स्थानक करावे. नफ्यासाठी प्रवाशांना वेठीस धरू नये, असे अध्यक्ष ग्राहक पंचायत पुणे विभागाचे विलास लेले यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community