MSRTC Recruitment : एसटी महामंडळात ५ हजार चालकांची भरती!

एसटी महामंडळाने ५ हजार चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन दिवसांत याबाबत जाहिरात काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपादरम्यान एसटी सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. यावेळी एसटी महामंडळाने कंत्राटी चालकांची भरती करून एसटी सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संप समाप्त झाल्यावर कंत्राटी चालकांची संख्या कमी करण्यात आली होती. तसेच मुदत संपलेल्या काहींना मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांचा समावेश आहे.

( हेही वाचा : CSMT Railway Station : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे १३५ वर्षात ४ वेळा बदलले नाव)

कंत्राटी चालक भरती

आता एसटी महामंडळाने पुन्हा एकदा पाच हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यात २९ हजारांपेक्षा अधिक एसटी चालक आहेत. काही चालक अन्य विभागांमध्ये बदली झाल्यानंतर ३ ते ४ वर्षांनी पुन्हा मूळ आगारात बदली करून घेतात. त्यामुळे ज्या आगारातून बदली करून घेतली त्याठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासते. प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी एसटी महामंडळाकडून कंत्राटी चालक भरती करण्यात येणार आहे.

दोन दिवसांत जाहिरात निघणार 

पाच हजार कंत्राटी चालकांची भरती ही खासगी कंपनीमार्फत करण्यात येणार आहे ही भरती टप्प्याटप्प्याने होईल आणि याबाबतची जाहिरात २ ते ३ दिवसांत प्रसिद्ध करण्यात येतील तसेच प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी एसटीत भरती होऊ शकतात, एसटीत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवल्यास त्यांची भरती करण्यात येईल याबाबत सुद्धा लवकरच निर्णय घेण्यात येईल असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here