राष्ट्रीय महामार्गावर अचनाक MSRTC बस पेटली, अमरावतीतील बर्निंग बसचा बघा व्हिडिओ 

179

अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अमरावती शहरापासून 20 किलोमीटर दूर पिंपळविहीर गावाजवळ 35 प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागली. या बसने अचानक पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली. एसटी बस चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने 35 प्रवाशांचे प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – पुण्यात बर्निंग बस… शिवशाहीला शास्त्रीनगर चौकात भीषण आग; पहा संपूर्ण व्हिडिओ)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर आगाराची ही एसटी बस होती. अमरावतीवरून ही बस नागपूरच्या दिशेने रवाना झाली होती. दरम्यान, चालत्या एसटी बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याने ही आग सर्वत्र पसरली व पाहता पाहता एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली. एसटी बसला आग लागल्याने अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प होती. तर, अग्निशामक दलाने तासाभरानंतर एसटीला विझवण्यात त्यांना यश आले व तासाभरानंतर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरळीत झाली आहे.

बघा बर्निंग बसचा बघा व्हिडिओ 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.