MSRTC: शालेय शैक्षणिक सहलीसाठी एसटी महामंडळाच्या ‘लालपरीला’च पसंती

262

शाळांकडून काढण्यात येणाऱ्या शैक्षणिक सहलींसाठी बहुतांश शाळांनी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी (MSRTC) बसलाच पसंती दिली आहे. त्यामुळे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये अमरावती विभागातून १८७ बसमधून सहली निघाल्या. यापैकी काही बसने नोव्हेंबरमध्ये प्रवास केला असून, दररोज सात ते आठ बसेस सहली करीता आरक्षित असतात. सहलीच्या माध्यमातून दोन महिन्यात ४७ हजार ५५६ किमीचा प्रवास एसटी बसने केला आहे.

(हेही वाचा – मेंदूच्या पेशी नष्ट करणारा ‘Brain-Eating Amoeba’ आहे तरी काय? ‘या’ देशात पहिल्या रुग्ण)

विद्यार्थ्यांकरिता शिक्षणासोबतच शालेय सहलीचा समावेशही अभ्यासक्रमात आहे. विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त इतर बाबींची माहिती व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्यातील क्षमतांचा विकास व्हावा यासाठी शाळेत शिक्षण दिले जाते. परंतु, शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरक्त इतर परिसराची ही शैक्षणिक माहिती मिळावी या हेतूने अनेक शाळांकडून शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांनी शैक्षणिक सहलींचे नियोजन केले आहे.

सहलीसाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी एसटी बसला पसंती दिली आहे. त्यामुळे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील आगाराच्या आजपर्यंत १८७ विद्यार्थ्यांना सहल घडवून आणली, तर या महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी काही बसेसची बुकिंग झाली असून त्या बसेस सहलींसाठी धावणार आहेत. यासोबतच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यासाठी काही बसेसच्या बुकिंग संदर्भात नियोजन होत असल्याची माहिती विभागीय अधिकारी अभय बिवरे यांनी दिली. तसेच अमृत महोत्सवानिमित्त महामंडळाने जेष्ठांसाठी मोफत प्रवास ही योजना लागू केली होती. त्या योजनेत जेष्ठ नागरिकांनी ऑगस्ट महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंत सहा लाखाच्यावर नागरिकांनी याचा लाभ घेतलेला असल्याचेही विभागीय अधिकारी यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.