लालपरीचे कर्मचारी पोटाची खळगी भरण्यासाठी करतायंत ‘ही’ कामे

117

गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटीचे राज्यशासनात विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी लालपरीचे कर्मचारी संपावर कायम आहेत. दरम्यान, एसटी महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार लवकर कामावर रूजू व्हा, असे आवाहन देण्यात आले. संपात सहभागी झालेल्या असणाऱ्या कित्येक कर्मचाऱ्यांवर महामंडळाकडून सेवा समाप्ती, निलंबन, बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात कर्मचारी कामावर हजर नसल्याने त्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे लालपरीचे कर्मचारी पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला येईल ते काम करताना दिसत आहेत.

कोणाच्या हाती वस्तरा तर कोण बनला नाव्ही

परिणामी, काही एसटी कर्मचाऱ्यांनी हातात वस्तरा घेऊन नाव्ह्याचं काम करत आहे, काही एसटी कर्मचाऱी कुणाची गाडी चालवत आहे. तर काही कर्मचारी भाजीपाला देखील विकून चार पैसे कमवून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.

(हेही वाचा – एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! आता ‘ही’ माणसं होणार लालपरीचे चालक अन् वाहक)

आतापर्यंत एसटी महामंडळाकडून ५५५५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे तर ११ हजरांहून अधिक कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यासह कामावर रुजू होत नसल्याने ७ हजार २३५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

म्हणून महामंडळाने घेतला निर्णय 

गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्यामध्ये चालक आणि वाहक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्याचा फटका एसटी बसच्या वाहतुकीला बसत आहे. यावर पर्याय म्हणून हा निर्णय एसटी महामंडळ घेत आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना त्या त्या आगारात प्रशिक्षणही दिले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार संप कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहक परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती दिली गेली त्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन, त्यांचा प्रवासी वाहनांवर चालक म्हणून वापर केला जाईल. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना त्या त्या आगारात प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.