६ हजार संपकऱ्यावर कारवाईची टांगती तलवार! एसटी महामंडळाचा आक्रमक पवित्रा

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण व्हावे, या मागणीसाठी तब्बल ५ महिने राज्यभरातील एसटी कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून होते. यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी वारंवार आवाहन केल्यानंतर राज्यातील विविध आगारात संपकरी कर्मचारी कामावर रूजू होऊ लागले. मात्र जे कामावर हजर होत नव्हते आणि विलनीकरणाच्या मागणीवर ठाम असेलेल कर्मचारी संपावर कायम होते, त्यांच्यावर महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने एसटी संपकरी संपकऱ्यांसह बडतर्फ कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यासाठी २२ एप्रिलपर्यंत मुदत दिल्यानंतरही अद्याप ६ हजार कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे अखेर लालपरी धावली असली तरीही एसटी महामंडळ आक्रमक झाले असून या कर्मचाऱ्यांवर अद्याप कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

एसटी महामंडळाने दिले स्पष्टीकरण

दरम्यान, ८ एप्रिल रोजी शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतले जाणार नाही, असे स्पष्टीकरण एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी आंदोलनापूर्वी म्हणजे ३० सप्टेंबर रोजी महामंडळात १ लाख २६ हजार १३९ मंजूर कर्मचारी पदापैकी ९२ हजार २६६ कर्मचारी हजर झाले होते. या सर्व कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता. मात्र २२ एप्रिलच्या शेवटी ८२ हजार ३६० कर्मचारी सेवेत रूजू झाले आहे.

(हेही वाचा – एसटीच्या 48 हजार कर्मचाऱ्यांकडून घेतले पैसे; न्यायालयात सदावर्तेंची कबुली)

सदावर्तेंना दिलासा, जामीन मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाने एसटी संपावर दिलेल्या निर्णयानंतरही संपकरी एसटी कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी ८ एप्रिल रोजी धडकले. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू असून २२ एप्रिल रोजी राज्यातील कर्मचारी कामावर रूजू झालेत. दरम्यान, शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणातील एकूण ११५ जणांनांदेखील जामीन मंजूर करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here