एसटीत 11 हजार चालकांची होणार भरती!

185

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही, असा निर्णय त्रिसदस्यीय समितीने दिल्यानंतरही, एसटीचे कर्मचारी मात्र अजूनही कामावर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे एसटी सुरळीत चालू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोठं पाऊल उचललं असून, 11 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एका खाजगी कंपनीशी करारही करण्यात आला आहे.

म्हणून कंत्राटी चालक भरती

एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम असल्याने, महामंडळाने 1 हजार 750 कंत्राटी चालकांची भरती केली आहे. आता आणखी 11 हजार चालकांची भरती करण्यात येणार असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले आहे. वाहक आणि चालक अशा दोन्ही जबाबदा-या पार पाडणा-या कर्मचा-यांना काही दिवसांनी पूर्णपणे वाहकाची जबाबदारी देण्यात येणार आहे.

( हेही वाचा :24 महिन्यांत 36 इमारती विकत घेतल्या, सोमय्यांचा जाधवांवर आरोप! )

गरज पाहून सेवेत घेणार

सध्या एसटीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 81 हजार 683 असून त्यातील 31 हजार 234 कर्मचारीच कामावर आहेत. चालकांची भरती महामंडळाकडून करण्यात येत आहे. पण, वाहकांची मात्र भरती झालेली नाही. त्यामुळे केवळ चालकच आहेत वाहकांचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एसटीत खासगी संस्थेमार्फत मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. जसजशी गरज असेल, त्याप्रमाणे त्यांना सेवेत घेतले जाईल, असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.