Muhurat Diwali Pooja : यंदा लक्ष्मीपूजन केव्हा करावे ?

कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळीतील लक्ष्मीपूजन असते. दीपोत्सवाचा सण 5 दिवस साजरा केला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षीची दिवाळी विशेष असेल; कारण अनेक दशकांनंतर दिवाळीत अनेक शुभ योग आणि राजयोग एकाच वेळी येत आहेत.

219
Muhurat Diwali Pooja : यंदा लक्ष्मीपूजन केव्हा करावे ?
Muhurat Diwali Pooja : यंदा लक्ष्मीपूजन केव्हा करावे ?

दिवाळी २०२३ च्या शुभ मुहूर्तावर पाच राजयोगांसह लक्ष्मीपूजन होईल, असा योगायोग अनेक वर्षांनंतर आला आहे. (Muhurat Diwali Pooja) आश्विन महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. आश्विन अमावास्येच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. प्रदोष काळ हा लक्ष्मीपूजनासाठीचा सर्वोत्तम काळ मानला जातो. यंदा अमावस्या 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने देवी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. (Muhurat Diwali Pooja)

(हेही वाचा – Dhanteras : धनत्रयोदशीला कोणत्या वस्तूंची खरेदी कराल, जाणून घ्या…)

यंदा कार्तिक अमावस्या 12 आणि 13 नोव्हेंबर या दोन्ही दिवशी असेल; परंतु दिवाळीचा सण 12 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल. अमावस्या तिथी 12 नोव्हेंबरच्या दुपारी सुरू होईल. रविवारी रात्रीच लक्ष्मीपूजन केले जाईल. (Muhurat Diwali Pooja)

यंदा लक्ष्मीपूजन केव्हा करावे ?

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त – सायंकाळी 5.40 ते 7.36 पर्यंत
कालावधी : 1 तास 54 मिनिटेप्रदोष काळ : 5.29 ते 8.07वृषभ काळ : 5. 40 ते 7. 36

दिवाळीत 5 राजयोग

या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळी 5 राजयोग तयार होत आहेत. याशिवाय आयुष्मान, सौभाग्य आणि महालक्ष्मी हे योग तयार होत आहेत. अशा प्रकारे दिवाळी 8 शुभ योगांमध्ये साजरी होईल. दिवाळीला असा शुभ योग अनेक दशकांनंतर निर्माण झाला आहे, असे ज्योतिष तज्ञ सांगतात. (Muhurat Diwali Pooja)

(हेही वाचा – Halal Free Diwali : दिवाळीची खरेदी करताय, सतर्क रहा…)

गजकेसरी, हर्ष, उभयचरी, काहल आणि दुर्धरा हे 5 योग असतील. या राजयोगांची निर्मिती शुक्र, बुध, चंद्र आणि गुरु ग्रहांच्या स्थानांमुळे होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योग खूप शुभ मानला जातो. हा योग लाभदायी असतो. हर्ष योगामुळे संपत्ती आणि यश वाढते. काहल ,उभयचरी आणि दुर्धरा योगही येत आहेत. (Muhurat Diwali Pooja)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.