-
ऋजुता लुकतुके
यंदा मुहूर्ताचं ट्रेडिंग नेमकं कधी होणार, ३१ ऑक्टोबर की, १ नोव्हेंबर यावर गोंधळाचं वातावरण होतं. पण, आता दोन्ही महत्त्वाच्या शेअर बाजारांनी याविषयी स्पष्टता दिली आहे. मुहूर्ताचं ट्रेडिंग ३१ ऑक्टोबर नाही तर १ नौव्हेंबरला होणार आहे. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्ही बाजारांमध्ये एकाच वेळी १ तासाचं हे ट्रेडिंग पार पडेल. हिंदू दैनंदिनीनुसार, दिवाळीपासून नवीन संवत्सराची सुरुवात होते. आणि परंपरेनुसार, या दिवशी एरवी सुटी असली तरी एक तासासाठी लक्ष्मीची पूजा करून देशातील शेअर बाजारात शुभारंभाचे सौदे केले जातात. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या वेबसाईटवर वेळाही देण्यात आल्या आहेत. संध्याकाळी ६ ते ७ या कालावधीत सौदे पार पडतील. तर त्यापूर्वी पावणेसहा तो सहा या वेळेत प्री-ट्रेडिंग सत्र पार पडेल. (Muhurat Trading)
(हेही वाचा- “तुम्हीच सांगा मी लढलो तर मी जिंकेन की हरेन?”, Sada Sarvankar यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल)
मुहूर्त ट्रेडिंगला लक्ष्मीपूजन केले जाते. यावेळच्या मुहूर्त ट्रेडिंगबद्दल थोडा गोंधळ होता. कारण, दिवाळी नेमकी कुठल्या दिवशी तिथीने सुरू होईल याविषयी संभ्रम होता. पण, आता मुहूर्ताचा दिवस ठरला आहे. बाबत बीएसई आणि एनएसईकडून वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल. सध्या बीएसईच्या वेबसाईटवर १ नोव्हेंबर हीच तारीख जाहीर करण्यात आली आहे. (Muhurat Trading)
Muhurat Trading 2024 ✨
Date: 1st November
Time: 6 pm to 7pm#Diwali #MuhuratTrading #2024 #NSE #BSE pic.twitter.com/aMRbKQx0KW— Janhavi Ladda (@JanhaviLadda) October 20, 2024
भारतीय परंपरेनुसार, व्यापारी समाज दिवाळीच्या दिवसाला नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात मानतात. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी अगदी एका तासांचे सौदे होत असले तरी हा समाज मोठ्या प्रमाणावर यात सहभागी होतो. आणि अगदी सणाच्या वातावरणात मुहूर्ताचं ट्रेडिंग पार पडतं. छोट्या गुंतवणूकदारांनी मात्र मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. कारण या दिवशी शेअर बाजारात मोठे चढउतार येतात. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. (Muhurat Trading)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community