तीन तासांत खात्मा करणार… अँटिलिया प्रकरणानंतर अंबानी कुटुंबाला पुन्हा धमकी

128

रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अँटिलिया प्रकरणानंतर आता अंबानी कुटुंबाला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. यावेळी रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयाच्या डिस्प्ले क्रमांकावर धमकीचे फोन आला आहे. कॉलरने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिली, त्यानंतर रूग्णालयातील लोकांनी याबाबत डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. मिळालेल्या माहितीनुसार, एकून ८ वेळा हे धमकीचे कॉल आले होते. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

(हेही वाचा – Azadi ka Amrit Mahotsav: स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला वेगळ्या पद्धतीने फडकावला जातो ध्वज! काय आहे फरक?)

“तीन तासात अंबानी कुटुंबीयांना ठार करणार”

अँटिलिआ प्रकरणानंतर दुसऱ्यांदा धमकी आल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून या फोन कॉलमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने तीन तासात अंबानी कुटुंबीयांना ठार करणार असल्याची धमकी दिली. रिलायन्स फाऊंडेशनच्या रूग्णालयाच्या फोनवर हा धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांचे नाव घेऊन ही धमकी दिली. या फोननंतर रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

तसेच अंबानी यांना धमकी देणारे ८ फोन कॉल्स आले होते. या फोन कॉलची चौकशी सुरू झाली असून एकाच दिवशी हे आठ कॉल्स आजच आले. पोलिसांचे एक पथक रिलायन्स रूग्णालय दाखल झाले आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला जात असल्याचे सांगितले जात आहे. रिलायन्स फाउंडेशन संचलित रुग्णालयाचे सीईओ डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत, आम्ही या धमकी देणाऱ्या फोन कॉलला गांभीर्याने घेतले असून फोन करणारे दहशतवादी असू शकतात असे त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.