मुकेश अंबानींच्या सुरक्षेत वाढ; गृहमंत्रालयाने दिली Z+ सुरक्षा

124

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांना गृह मंत्रालयाने झेड प्लस सुरक्षा दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीत स्फोटके आढळली होती. तसेच मुकेश अंबानी यांनी जीवे मारण्याच्या धमक्याही आल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांना देण्यात आलेल्या सुरक्षेचा सर्व खर्च मुकेश अंबांनी हे स्वत: उचलतात. काही दिवसांपूर्वी सर्वो्च्च न्यायालयात मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढण्याची याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु तेव्हा देखील न्यायालयाने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले होते.

( हेही वाचा: शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या )

2013 मध्येही दिली होती Z+ सुरक्षा 

त्यामुळेच आता केंद्र सरकारकडून अंबानी यांना Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. अंबानी कुटुंबाच्या Z+ सुरक्षेवर दर महिन्याला 20 लाखांहून अधिकचा खर्च केला जातो. पण Z+ सुरक्षेचा संपूर्ण खर्च मुकेश अंबानी हे स्वत: उचलतात. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या धमक्यांमुळे अंबानींना 2013 मध्ये यूपीए सरकारनेदेखील Z+ सुरक्षा प्रदान केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.