मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लवकरच अमेरिकन कंपनी रेव्हलाॅन इंकचे अधिग्रहन करण्याच्या विचारात आहे. सध्या रेव्हलाॅन इंक ही सौंदर्य प्रसाधने बनवणारी दिग्गज कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे. रेव्हलाॅनने दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे.
अहवालानुसार, रिलायन्सने मोठ्या तेल करारांमधून माघार घेतल्यानंतर, फॅशन आणि वैयक्तिक काळजी या क्षेत्रांत आपले स्थान मजबूत करत आहे. मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स तेलापासून रिटेलपर्यंत वरचढ आहे आणि आता कंपनी काॅस्मेटिक क्षेत्रात रस घेत आहे. रेव्हलाॅन इंक मार्च तिमाहीच्या अखेरीस कंपनीवर $3.31 अब्ज कर्ज होते.
( हेही वाचा: मोठी बातमी! मलिक आणि देशमुख यांना विधान परिषदेच्या मतदानासाठी परवानगी मिळणार? )
मागण्या पूर्ण करु शकत नाही
लाॅकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे आणि लोक पुन्हा घराबाहेर पडल्यामुळे अलिकडच्या काही महिन्यांत जगभरात सौंदर्यप्रसाधनांची मागणी पुन्हा एकदा वाढली आहे. त्यामुळे रेव्हलाॅन इंक या कंपनीला अनेक डिजिटल स्टार्टअर ब्रॅंडकडून स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, कंपनीने मार्चमध्ये सांगितले होते की, पुरवठा आघाडीवर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि यामुळे मागणी पूर्ण करु शकत नाही.