मुकुल रोहतगी भारताचे नवे महान्यायवादी होण्याची शक्यता

न्यायालयीन खटल्यांमध्ये केंद्र सरकारची बाजू मांडणा-या भारताच्या महान्यायवादी (Attorney General of India)या पदावर ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांची पुन्हा एकदा निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याचे महान्यायवादी केके वेणुगोपाल यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपत असल्यामुळे रोहतगी यांची नियुक्ती होऊ शकते.

पदभार स्वीकारण्याची शक्यता

2014 ते 2017 या काळात सुद्धा मुकुल रोहातगी यांनी भारताचे महान्यायवादी म्हणून कार्यभार सांभाळला होता. सध्याचे 91 वर्षीय वेणुगोपाल हे आता या पदावर राहण्यास इच्छुक नसल्याचे सांगण्यात येत आहे. 2020 मध्ये वेणुगोपाल यांनी आपल्या पदाचा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आपल्या वयाचे कारण देत या पदावरुन मुक्त करण्याची विनंती सरकारला केली होती.

पण त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने त्यांना अजून 2 वर्षांसाठी काम करण्याची विनंती केली होती. दरम्यान, रोहतगी यांच्या नियुक्तीची अधिसूचना अजून जारी करण्यात आलेली नाही. पण 1 ऑक्टोबरपासून ते महान्यायवादी म्हणून कार्यभार सांभाळू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

कोण आहेत रोहतगी?

मुकुल रोहतगी यांनी यापूर्वी महान्यायवादी पदासोबतच भारताचा अतिरिक्त महान्यायाधिकर्ता(Solicitor General of India)म्हणून देखील काम केले आहे. 2017 मध्ये त्यांनी महान्यायवादी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुद्धा जम्मू-काश्मीरमधील वादग्रस्त 370 कलम रद्द करण्याबाबत केंद्र सरकारने त्यांच्याशी सल्लामसलत केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here