अंधेरीत चित्रकूट मैदानात सिनेमाच्या सेटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील अंधेरीमध्ये चित्रकूट मैदानामध्ये सिनेमाच्या सेटला आग लागली आहे. फन रिपब्लिक सिनेमागृहामागच्या सिनेमाच्या सेटला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे प्रचंड लोळ सध्या आजूबाजूच्या परिसरात दिसत आहेत. आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आगीवर अजूनही पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही.

अंधेरीतील चित्रकूट मैदानात एका सिनेमाचा सेट उभारण्यात आला आहे. याच सेटला भीषण आग लागली आहे. अंधेरीतील D.N नगरमधील ही घटना आहे.

( हेही वाचा: द्रौपदीची विटंबना कलीयुगातले दुःशासनही करताहेत, काँग्रेसने माफी मागावी )

‘लव रंजन’ चित्रपटाचा सेट

आग लागल्यामुळे संपूर्ण परिसर धुराने व्यापला असून सध्या त्या सेटवर किती लोक अडकले आहेत, किती जणांची सुटका करण्यात आली आहे, ही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रकुट मैदानावर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपट लव रंजन चा सेट उभारण्यात आला होता. सेटवर लाईटींगचे काम सुरु होते. त्यावेळी ही आग लागली आहे. पुढील आठवड्यापासून चित्रीकरणाची सुरुवात होणार होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here