Mumbai Accident News: मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर अपघात; टेम्पो पलटी, चालकाचा मृत्यू

90

मुंबईत पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड या ठिकाणी भरधाव वेगाने जात असलेल्या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो डिव्हायडरला धडक मारुन पलटी झाला. या अपघातामध्ये टेम्पो चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

( हेही वाचा: बेस्टच्या ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बससेवेला प्रवाशांची प्रतीक्षा )

वाहतूक सुरळीत

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. टेम्पोला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या मार्गावरील वाहतूक सुरळित करण्यात आली आहे.

पाच दिवस अलर्ट

मुंबई कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तुफान फटकेबाजी सुरु असतानाच, पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांला अतिवृष्टी तर काही जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.