मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघातात; एकाच घरातील 4 जण ठार

135

मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरी येथील पंढरपूरवाडी समोर भीषण अपघात होऊन एकाच कुटुंबातील ४ जण जागेवरच ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार, 8 मार्च रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास पंढरपूरवाडी समोर नाशिकहून मुंबईकडे जाणारी एसेंट कार एम.एच. 04 एफ.ए. 8291 ही गाडी भरधाव वेगाने जात असताना गाडीचा पुढील टायर फुटल्याने ही कार थेट उडून मुंबईहून नाशिककडे अपघातग्रस्त वॅगनर कार घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर जोरदार आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील १ लहान मुलगी, १ महिला व २ पुरुष जागेवर ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी सर्व्हिस रोडने वाहतूक वळवली.

(हेही वाचा राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव; अजित पवार यांचे टीकास्त्र)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.