मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने सलग पाचव्यांदा कार्गो एअरपोर्ट ऑफ द ईयर- रिजन इंडिया किताब पटकावला आहे. एअर कार्गो इंडिया 2022 सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हवाई मालवाहतुकीत नवकल्पनांचा अवलंब कार्यक्षम डिजिटल साखळी तयार करण्यासह उत्तमोत्तम पायाभूत सुविधा निर्माण केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
उड्डाणात 30 टक्क्यांची वाढ
मुंबईत पार पडलेल्या सोहळ्यात मिआलचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज सिंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कोरोनापूर्वकाळात मालवाहतुकीशी संबंधित 500 हून अधिक ठिकाणांना मुंबई विमानतळाशी जोडण्यात आले होते. भारतीय बनावटीची औषधे, नाशवंत वस्तू, ऑटोमोबाईल्स आणि अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीसाठी हे एक प्रमुख व्यासपीठ आहे. 2021 च्या तुलनेत चालू वर्षात कार्गो विमानांच्या उड्डाणात जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिवाय देशांतर्गत मालवाहतुकीत 40 टक्के, तर आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतुकीत 26 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या पुरस्कारामुळे अधिक जोमाने काम करण्याचे बळ मिळाले, अशी माहिती त्यांनी दिली.
( हेही वाचा: महाराष्ट्राला मिळणार पहिली ‘वंदे भारत’ ट्रेन; आता मुंबई- पुणे प्रवास फक्त अडीच तासांत )
Join Our WhatsApp Community