मुंबई विमानतळावर ९.८ कोटींच्या कोकेनसह एकाला अटक

140

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क पथकाने सोमवारी ९.८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ET-610 वरून मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशाकडून सीमाशुल्क पथकाने ९८० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. याची किंमत ९.८ कोटी रुपये आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातून कोकेनची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

(हेही वाचा – उत्तर कोरियाने टोकियोवरुन डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र; जपानमध्ये खळबळ, नागरिक भूमिगत)

मुंबईत एकाच आठवड्यातील अशी ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २९ सप्टेंबर रोजी मुंबई विमानतळावर कस्टमच्या पथकाने ४९० ग्रॅम कोकेन घेऊन जाणार्या एका प्रवाशाला पकडले होते. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत ४.९ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. महिला प्रवाशाने तिच्या सॅंडलमध्ये बनवलेल्या एका विशेष छिद्रात कोकेन लपवून आणले होते. प्रवाशी महिलेला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.