जगातील सगळ्यात महागड्या रस्त्यावरून तुम्ही गेला आहात का? जाणून घ्या मुंबईतील या रस्त्याबद्दल

जगातील सगळ्यात 10 महागड्या रस्त्यात ज्याची गणना केली जाते. त्या रस्त्यावरुन आपण सगळे कधी ना कधी गेलो आहोत. पण हा रस्ता जगातील महागड्या रस्त्यांपैकी एक असल्याचे माहिती नसल्याने लक्षात आले नसावे एवढेच. आता तुम्हाला वाटेल की रस्ता बांधण्यासाठी आलेल्या खर्चावरुन रस्त्याची किंमत ठरवली जात असावी. पण तसे नाही. त्या रस्त्याच्या बाजूला उभ्या असणा-या इमारतींमुळे, काही महत्त्वाच्या वास्तू आणि श्रीमंत व्यक्तींवरुन तो रस्ता महागडा ठरत असतो.

अशाच जगातील 10 महागड्या रस्त्यांपैकी एक रस्ता मुंबईत आहे. या रस्त्याचे नाव आहे अल्टामाउंट रोड.

…म्हणून हा रस्ता आहे सगळ्यात महागडा

या अल्टामाउंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. तसेच, अनेक महत्त्वाच्या वास्तू आणि बिल्डिंगचे याच रस्त्यावर दर्शन होते. येथे इंडोनेशिया व दक्षिण आफ्रिका या देशांच्या वकिलाती आहेत. या रस्त्याला जोडलेल्या कारमायकल रोडवर बेल्जियम, चीन आणि जापान या देशांच्याही वकिलाती आहेत. याशिवाय अल्टामाउंट रोडवर बाॅम्बे पोर्ट ट्रस्टच्या चेअरमनचे अधिकृत निवासस्थान आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांचे अधिकृत निवासस्थानदेखील याच अल्टामाउंट रोडवर आहे.

नोव्हेंबर 2015 मध्ये अपार्टमेंटमधून भारतातील सर्वात महागडा फ्लॅट विकला गेला ते लोढा बिल्डर्सचे लोढा अल्टामाउंट हे लक्स्झरियस अपार्टमेंटसुद्धा याच अल्टामाउंट रोडवर आहे.

( हेही वाचा :ATMच्या शोधाची भन्नाट कहाणी )

( हेही वाचा: ‘आधी लगीन कोंढाण्याचे, नंतर रायबाचे’ त्या रायबाचे पुढे काय झाले ? )

मफतलाल काॅम्लेक्स आणि सुप्रसिद्ध डिझायनर स्टोर अझा देखील याच रोडवर आहे. तसेच, जगातील सर्वात महागडे घर म्हणून ज्याची ओळख आहे ते मुकेश अंबानी यांचे एन्टालिया हे 27 मजली भव्य मेन्शनदेखील याच अल्टामाउंट रोडवर आहे.

त्यामुळे तुम्ही मुंबईत कधी आलात, तर या अल्टामाउंट रोडला नक्की भेट द्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here