#AmbedkarJayanti: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कधी होणार पूर्ण ?

138

डाॅक्टर बाबसाहेब आंबेडकरांची ही 131 वी जयंती आहे. त्यानिमीत्ताने जाणून घेऊया की दादरमधील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणा-या डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कधी पूर्ण होणार आहे. दादरच्या इंदू मिलच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 4.84 हेक्टर जागेवरील स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपवण्यात आली.

अजून दोन वर्ष विलंब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2015 मध्ये स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. दादरमधील इंदू मिलच्या आवारात होऊ घातलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम संथगतीने सुरू आहे. हा प्रकल्प 2021 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप प्रकल्पाचे निम्मे कामही पूर्ण झालेले नाही. स्मारक इमारत, पुतळय़ाच्या पदपीठाची कामे पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार आहेत. परिणामी, या प्रकल्पाच्या कंत्राटास मुदतवाढ देण्यात आली असून, आता हे स्मारक मार्च 2024 मध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

( हेही वाचा: या जिल्ह्यात एसटी धावणार पूर्ण क्षमतेने, प्रशासन सज्ज! )

स्मारकात काय असणार?

  •  450 फूट उंचीचा डॉ. आंबेडकर यांचा कांस्य पुतळा
  • स्मारक इमारतीत चैत्यसभागृह, संग्रहालय, प्रदर्शन केंद्र, पुतळय़ाच्या पायाजवळ पोहचण्यासाठी वर्तुळाकार मार्ग.
  • प्रवेशद्वार इमारतीत माहिती केंद्र, तिकीटघर, सामान कक्ष, स्वच्छतागृह, नियंत्रण कक्ष, उपाहारगृह इत्यादी.
  • संशोधन केंद्र, विपश्यना केंद्र, ग्रंथालय, सभागृह (1 हजार आसन क्षमता), वाहनतळ इत्यादी.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

  • इंदू मिलच्या परिसरातील तळ्याची सुधारणा आणि सुशोभिकरण करून महाडच्या चवदार तळ्याची प्रतिकृती साकारली जाणार
  • स्मारक इमारतीच्या पाठपीठामध्ये बौद्ध वास्तूरचना शैलीतील घुमट, चैत्यसभागृह, संग्रहालय असेल. तसेच यात प्रदर्शन भरवण्याची सोय असेल.
  • पुतळ्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी पादपीठात ६ मीटर रुंदीचा आंतरिक आणि बाह्य चक्राकार मार्ग प्रस्तावित आहे. यामध्ये विविध कलाकृती साकारल्या जाणार आहेत
  •  1 हजार नागरिक बसण्याच्या क्षमतेचे प्रेक्षागृहाची उभारणी. आर्टगॅलरी.
  • 100 आसनी क्षमतेचे 4 संशोधन केंद्र वर्ग
  • संशोधन केंद्रात सुसज्ज ग्रंथालयाची उभारणी
  • विपश्यना केंद्र
  • परिक्रमापथ
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.