तापमानात मुंबई आणि कॅनडाची बरोबरी!

हा सगळा परिणाम ग्लोबल वार्मिंगचा असल्याचे हवामान शास्त्रज्ज्ञ सांगत आहेत. ही अमेरिकेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

ग्लोबल वार्मिंगचा आता जगभरात ठळक दुष्परिणाम दिसू लागला आहे. ही समस्या आता जगासाठी फार मोठी डोकेदुखी बनण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतात कधी नव्हे ते इतका पाऊस कोसळत आहेत, ठिकठिकाणी महापूर येत आहेत. असा पाऊस पहिल्यांदा अनुभवत असल्याचे वयोवृद्ध सांगत आहेत. तिच अवस्था अमेरिकेत आहे. त्या ठिकाणी १५ ते २० डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या शहरांमध्ये सप्टेंबर महिन्यात पारा तब्बल ३५-३७ सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे अमेरिकेची झोप उडाली आहे. आता तापमानात कॅनडा, ह्यझन या थंड शहरांनी मुंबईची बरोबरी केली आहे.

अमेरिकेतील ४८ शहरांचे तापमान वाढले!

हा सगळा परिणाम ग्लोबल वार्मिंगचा असल्याचे हवामान शास्त्रज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे ही अमेरिकेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. अशा प्रकारे इतिहासात कधीच या भागात इतके तापमान वाढले नव्हते. विशेष म्हणजे मागील आठवड्यात न्यू इंग्लंड येथील हिल स्टेशन असलेल्या रॉकीज या भागात बर्फ पडला. मात्र त्याच वेळी अमेरिकेतील ह्यझन या हिल स्टेशनवर मात्र पारा ३७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचला होता. अमेरिकेतील ४८ राज्यांतील तापमानात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ह्यझन हे हिल स्टेशन आहे. त्याठिकाणी २ हजार ४०० इतकीच लोकसंख्या आहे, तसेच समुद्री सपाटीपासून १ हजार ८०० फूट उंचीवर आहे. तरीही या ठिकाणी तापमान ३७ डिग्री सेल्सिअस झाले आहे. हीच स्थिती दक्षिण डकोटा, उत्तर डकोटा या शहरांची आहे, इथेही तापमान ३७ डिग्री आहे. बिस्मार्क शहराचे तापमान ३५ डिग्री, तर कॅनडाचे ३५ डिग्री बनले आहे.

(हेही वाचा : आता किरीट सोमय्यांच्या रडारवर विश्वास नांगरे-पाटील!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here