मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! गुजरातमध्ये १ हजार कोटींचे ५१३ किलो MD ड्रग्ज जप्त

135

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमध्ये मोठी कारवाई केली आहे. गुजरात मधील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात ड्रग्ज तयार करणारा कारखाना उघडकीस आणला आहे. मुंबई पोलिसांनी जवळपास ५१३ किलोचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून या अंमली पदार्थाची किंमत १ हजार २६ कोटी रूपये इतकी आहे. यावेळी पोलिसांनी एका महिलेसह ७ जणांना अटक केली आहे.

(हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात ‘भाजप’चं ढाक्कुमाक्कुम… ढाक्कुमाकुम..!)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाच्या वरळी युनिटने १०२६ कोटी किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. गेल्या काही महिन्यापासून मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे. याच कारवाईमध्ये काही महिन्यांपूर्वी शिवाजी नगर भागातून अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला होता. पोलिसांनी गोवंडीतील शिवाजी नगर येथून मार्च २०२२ मध्ये पहिल्या आरोपीला अटक केली त्यांच्या कडून २५० ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी ७०० किलो अंमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती.

(हेही वाचा – पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदेंचं ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र, म्हणाले…)

या प्रकरणाचा तपास करताना अंमली पदार्थ पुरवठ्याचे धागेदोरे गुजरातमध्ये असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमधील अंकलेश्वर भागात कारखान्यावर छापा मारला. यावेळी पोलिसांनी ५१३ किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. पोलिसांनी सात जणांना अटक केली असून यात एका महिलेचा समावेश आहे. त्यातील पाच जणांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आले. तर दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे सोपवण्यात आले आहे. अंमली पदार्थाची तस्करी करणारी ही आंतरराज्य टोळी असावी असा पोलिसांनी संशय आहे. ही टोळी काही राज्यांमध्ये कार्यरत असून युवकांना लक्ष्य करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.