मुंबईतील वांद्रे येथील शास्त्रीनगरमधील मध्यरात्री साडे बाराच्या सुमार दुमजली इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १६ जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ ते ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बीएमसीचं पथक आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत जखमींना भाभा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
A G+2 structure has collapsed at Shastri Nagar, Bandra West. Few people have been shifted to hospital. 3-4 suspected to be trapped in debris. Rescue operations are underway. The exact numbers awaited from hospital #MyBMCUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 8, 2022
मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास वांद्रे येथील शास्त्रीनगर भागात ग्राऊंड प्लस दोन अशी तीन मजल्याची इमारत कोसळली. तळमजल्यावरील सर्व नागरिक सुखरूप असून पहिल्या मजल्यावर ६ जणांना किरकोळ दुखापत झाली तर दुसऱ्या मजल्यावरील १७ जण गंभीर आहे. या १७ जणांपैकी घटनेदरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर इतर १६ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी दिली.तर बचावकार्य अद्याप सुरुच आहे. अजुनही काही लोक मलब्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीमध्ये बिहारमधून आलेले सर्व मजूर राहत होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या १६ लोक सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. रात्री सव्वा १२ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी मध्यरात्री २ वाजता केलेल्या ट्वीटनुसार, या ठिकाणी तत्काळ बचावकार्य करण्यास सुरूवात केली आहे. जखमींना रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
As per updates from AMO of Bhabha hospital to disaster management team of @mybmc as well as zonal DCP, @MumbaiPolice one person has unfortunately lost life in the Bandra West house collapse. 16 patients are admitted so far with minor injuries & I pray for their speedy recovery https://t.co/PthvO6MhsH
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 8, 2022
Join Our WhatsApp Community