एनसीबी अधिकाऱ्याला मदतीचा हात, राज्यपालांकडे धाव

'मंत्री नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत असून ही महाराष्ट्रातील राजकारणाला काळीमा फासणारी गोष्ट'

130

जात, धर्म आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मदतीला मुंबई भाजपा मैदानात उतरली आहे. यासाठी भाजपाच्या मुंबई स्थानिक शाखेच्या अध्यक्षांनी राज्यपालांची भेट घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्याला राज्यमंत्र्यांनी उघडपणे धमकावल्याच्या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली. मंत्री नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत असून ही महाराष्ट्रातील राजकारणाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. राज्यसरकारचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही यावर कारवाई झालीच पाहिजे. नवाब मलिक यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई अध्यक्ष व भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली.

…तर मलिकांनी त्वरित राजीनामा द्यावा

सरकारी अधिकाऱ्यांना धमकी दिल्या प्रकरणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सरकारी अधिकऱ्यांना धमकी दिल्यामुळे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन दिले असल्याचे मंगल लोढा यांनी सांगितले. यासह ते असेही म्हणाले की, महाराष्ट्र सरकार मधील मंत्री कायद्याचे उल्लंघन करत आहे.

(हेही वाचा -वानखेडेंच्या चौकशीसाठी दिल्लीहून मुंबईत पाच अधिकारी दाखल)

वेळ पडलीच तर आम्ही कोर्टातही जाऊ

सरकारी अधिकाऱ्यांना धमकावलं जात असून ही बाब महाराष्ट्रासाठी दुर्देवी आहे. नवाब मलिक यांना सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या द्यायच्या असतील तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. या घटना त्वरित थांबल्या नाहीत तर या संदर्भात आम्ही राष्ट्रपती, केंद्रीय गुहमंत्री यांची भेट घेऊ आणि वेळ पडलीच तर आम्ही कोर्टातही जाऊ, असा इशारा मंगल लोढा यांनी दिला. त्यावेळी अमरजित मिश्रा, उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.