BEST योजना! फक्त ५० रूपयांत करा ‘मुंबई’ शहराची सफर!

180

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी मुंबईत मोठ्या संख्येने दाखल होत असतात. या अनुयायांना मुंबई शहराची सफर करता यावी, यासाठी बेस्ट उपक्रमाने ५० आणि ६० रूपयांची दैनिक पास योजना आणली आहे.

चलो स्मार्ट कार्ड व्यतिरिक्त हे दैनिक पास प्रवाशांना ५ ते ७ डिसेंबर दरम्यान शिवाजी पार्क येथून खरेदी करता येणार आहेत. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी शिवाजी पार्क, चैत्यभूमी दादर येथे दाखल होतात. या प्रवाशांना बेस्ट उपक्रमाच्या बसमधून फिरता यावे, यासाठी जादा बसेसची व्यवस्थाही केली जाते.

(हेही वाचा – PMPML च्या प्रवाशांसाठी पुन्हा सुरू होणार ‘ITMS’ यंत्रणा, कसा होणार फायदा?)

 दरम्यान, एकाच तिकिटात संपूर्ण मुंबईत प्रवाशांना फिरता यावे म्हणून बेस्टने ५० व ६० रुपयांची दैनिक पास योजना सुरू केली आहे. अधिकाधिक प्रवाशांनी दैनिक पास खरेदी करावेत,असे आवाहनही बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.