CBI : सीबीआयने जाहीर केले मागील ८ महिन्यांतील घोटाळे; तब्बल २३,५६६ कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश

ही आकडेवारी केवळ मुंबईत सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांची आहे.

140
CBI : सीबीआयने जाहीर केले मागील ८ महिन्यांतील घोटाळे; तब्बल २३,५६६ कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश

नुकताच केंद्रीय गुन्हे अन्वेषण म्हणजेच सीबीआयच्या (CBI) मुंबई विभागाने मागील ८ महिन्यांचे प्रगतिपुस्तक जाहीर केले आहे. यामध्ये ८ महिने, ६० गुन्हे, २० सरकारी बँका, ६० कंपन्या आणि २३,५६६ कोटींचे आर्थिक घोटाळ्यांचा खुलासा करण्यात आला आहे.

जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत (CBI) मुंबई, बागपूर, पुणे या तीन शहरांत विविध क्षेत्रांतील कंपन्यांनी केलेल्या हजारो कोटींच्या आर्थिक घोटाळ्यांचा सीबीआयने पर्दाफाश केला आहे. तसेच याप्रकरणी एकूण ६० गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये बांधकाम उद्योग, पायाभूत सुविधा, ज्वेलरी उद्योग, मनोरंजन उद्योग, साखर कारखाने, वेअर हाउसिंग, बायोटेक आदी क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Rainfall : ऑगस्ट सरत आला तरीही देशात पर्जन्यतूट कायम!)

ही आकडेवारी केवळ मुंबईत सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांची (CBI) आहे. देशात अनेक राज्यांत अशाच प्रकारेच गुन्हे दाखल झाले आहेत.

‘या’ बँकांना फटका

एखाद्या बँकेकडून मोठ्या रकमेचे कर्ज दिले जाते त्यावेळी एकापेक्षा अनेक बँका (CBI) यामध्ये सहभागी असतात. त्या बँकांची एक समिती तयार होते. याला इंग्रजीमध्ये कन्सॉर्शियम म्हणतात. त्या समितीतर्फे संबंधित कंपनीला कर्ज दिले जाते. या सर्व कर्ज वितरणांमध्ये सरकारी बँकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसिज बँक, बँक ऑफ बडोदा, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, यूको बँक या बँकांचा समावेश आहे.

यातील किमान ६० प्रकरणांमध्ये सर्वाधिक फटका युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेला बसल्याचे सूत्रांनी सांगितले.

चालू वर्षात बँकांनी सुमारे २०० पेक्षा जास्त कंपन्या व त्यांच्या संचालकांविरोधात गुन्हे (CBI) दाखल केले आहेत. ज्या कंपन्यांविरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत ती कर्ज (CBI) प्रकरणे २०११ ते २०२१ या कालावधीतील आहेत.

प्रमुख कोणत्या कंपन्या? 
मुख्य संचालक कंपनी रक्कम
करुणाकरन रामचंद्र प्रतिभा इंडस्ट्रीज लि. ६५२४ कोटी
अजित कुलकर्णी जीटीएल इन्फ्रा.लि ४९५७ कोटी
ऋषी अगरवाल वद्राज सिमेंट लि. १६८८ कोटी
राजेश पोद्दार लोहा इस्पात १०१७ कोटी
दीपक कुलकर्णी डीएसके समूह ५९० कोटी
नरेश गोयल जेट एअरवेज ५३८ कोटी
रत्नाकर गुट्टे गंगाखेड शुगर लि. ४०९ कोटी
विनय फडणीस फडणीस समूह १९३ कोटी
मनोज तिरोडकर जीटीएल इन्फ्रा.लि ४०६३ कोटी

 

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.