Mumbai Special Traffic Block: मुंबईतील ‘या’ रेल्वे मार्गावर 3 दिवसीय विशेष ट्राफिक ब्लॉक

मुंबईतील लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही सानपाडा, जुईनगर ते तुर्भे अशा मार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी वाचा. रोड ओव्हर ब्रिजच्या रूंदीकरणासह विविध पायाभूत कामांकरता शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सानपाडा, जुईनगर ते तुर्भेदरम्यान विशेष ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

…म्हणून घेण्यात येणार विशेष ब्लॉक

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत ८०० एमटी रोड क्रेन वापरून रोड ओव्हर ब्रिजच्या रूंदीकरणासह विविध पायाभूत कामे पूर्ण करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Bank Strike: ‘या’ दिवशी तुमचे बँकेत काम तर नाही ना? बँक कर्मचाऱ्यांनी दिला संपाचा इशारा)

कोणत्या ट्रेन्स होणार रद्द!

दिनांक १० जून, ११ जून आणि १२ जूनदरम्यान रात्री ११.३० ते सकाळी ६.३० पर्यंत नेरूळ/वाशी-कोपर खैरणे विभागात हे काम हाती घेतले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वाशी/नेरुळ/पनवेलसाठी रात्री ११.०९ ते पहाटे ५.५३ पर्यंत ठाणे स्थानकाहून सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर डाऊन मार्गावरील सेवा आणि रात्री ११.०९ ते सकाळी ६.०२ पर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर सेवा रद्द राहतील, असे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे या तीन दिवसात या मार्गावर तुम्ही प्रवास करणार असाल तर पर्यायी मार्गाचा अवलंब करा, अन्यथा योग्य नियोजनासह बाहेर पडा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here