मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते फ्री प्रेस हाऊस: नवीन ए- १०० बसमार्ग शुक्रवारपासून सुरु

82

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून फ्री प्रेस हाऊस दरम्यान शुक्रवार १७ मार्च २०२३ पासून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते फ्री प्रेस हाऊस हा नवीन वातानुकूलित बसमार्ग क्र.ए-१०० सुरु करण्यात येत आहे. या मार्गावर बस सेवा सुरु करण्याची प्रवाशांकडून मागील अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी होत असून अखेर उपक्रमाने या मार्गावर नवीन क्रमांकाची बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेत ही सेवा शुक्रवारपासून प्रत्यक्षात सुरु होणार आहे.

या पूर्वी एनसीपीए या मार्गावर धावणाऱ्या बसमधून प्रवास करत मंत्रालयाजवळ उतर फ्रि प्रेस हाऊस जवळ प्रवाशांना चालत जावे लागत होते. किंवा तिथून जाणाऱ्या अन्य बसमधून प्रवास करत याठिकाणच्या प्रवाशांना जावे लागत होते, परंतु आता या नवीन बस मार्गामुळे चर्चगेट रेल्वे स्टेशन तसेच मंत्रालयाकडे येणाऱ्या प्रवाशांनाही या बसचा फायदा होणार आहे.

( हेही वाचा: महापालिका शाळांमधील सहलीचे नियोजन फसले, पाणी आणि जेवणही पोहोचले उशिरा )

( मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पहिली बस सकाळी आठ वाजता सुटेल व शेवटची बस ही पावणे नऊ वाजताची असेल, तर फ्री प्रेस हाऊसच्या ठिकाणाहून पहिली बस सकाळी सव्वा आठला सुटेल तर शेवटची बस ही रात्री नऊची असेल. या बसमार्गावरील बसगाडया सोमवार ते शनिवार (सार्वजनिक सुट्टीसह) कार्यान्वित असतील.

‘असा’ असेल बसमार्ग

मुंबई छत्रपती  शिवाजी  महाराज टर्मिनस – डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग – हुतात्मा चौक –अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) – हुतात्मा राजगुरु चौक (मंत्रालय) – फ्री प्रेस जर्नल मार्ग – फ्री प्रेस हाऊस

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.